स्वातंत्र्यवीराचे पुण्यस्मरण

दि. २६ फेब्रुवारी २००८ - स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२ वी पुण्यतिथी!

ज्यांच्या प्रेरणेने हिंदुस्थानात क्रांतिची ज्वाला धगधगली, ज्यांनी 'रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?' असा सवाल करीत पहिली २० ब्राउनिंग पिस्तुले हिंदुस्थानात पाठविली, ज्यांच्या दुर्दम्य इच्छेचे फलस्वरुप म्हणुन हिंदुस्थानात पहिला बाँब तयार झाला, ज्यांच्या '१८५७' या प्रकाशना आधीच जप्तीचे आदेश निघालेल्या क्रांतिग्रंथशिरोमणीने धगधगत्या क्रांतिकारकांची निर्मिती केली, ज्यांच्या क्षात्रतेजाने सत्ताधिश इंग्रजांची झोप उडाली, ज्या महावीराने ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा देणार्‍या न्यायासनाला 'तोपर्यंत तुमचे सरकार टिकेल काय?' असा मर्दानी सवाल केला, ज्या द्रष्ट्याने सैन्याचा पुरस्कार केला, ज्या महाकवीने अजरामर काव्याची निर्मिती केली, ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने मराठीचा पुरस्कार केला त्या स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकरांना त्यांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या दिनी सादर वंदन.

ते होते म्हणुन आपण आहोत.