आमची प्रेरणा माणूस१ यांची सुंदर कविता चूक
चूक, कुठे ही, सुधारण्याची संधी आहे?
माळ घातली, ही मरणाची नांदी आहे
रोज वेगळ्या मुली फिरवल्या श्रीमंतांच्या
सापडलो अन झाली ही लटकंती आहे
बोळे असती डाव्या-उजव्या कानामध्ये
घरात अमुच्या म्हणून इतकी शांती आहे
बायको घरी नाही, आता कशास डरणे ?
"कोण बोलले ?हा जरासा शिखंडी आहे !"
एक भिंतही नाही त्याने आज सोडली
बघेल तेव्हा सदा तंगडी वरती आहे
वाल हाणले मटार ही जोडीला त्याच्या
अन मेला म्हणतो कसली दुर्गंधी आहे?
रोज मंडई सजे नव्या कवितांची येथे
रोज बोलतो "केश्या", 'माझी चांदी आहे'