जमीन : चूक
जमीनदार : माणूस१
खोडसाळ तुज सुधारण्याची संधी आहे
विडंबनांवर येउ घातली बंदी आहे
एक गझलही येई ना तुज पाडायला
इतर कवींच्या वचनांची पुरचुंडी आहे
रोज मंडई सजे नव्या तव विडंबनांनी
रोज बोलतो वाचक, "ही तुकबंदी आहे"
वेगळ्या चुली जालांतर्गत धीमंतांच्या
तुझ्यामुळे कविवर्यांची गच्छंती आहे !
देत दूषणे छंदबद्ध अन् छंदमुक्त तुज
काव्य उपवनी नको तुझी दुर्गंधी आहे
शब्द फोडणी लसणासम यमकांची त्यावर
भाव काल्पनिक, वृत्त जरा स्वच्छंदी आहे
काव्य अंतरी नाही, आता कसले जगणे ?
व्यर्थ जमवली शब्दांची श्रीमंती आहे...