तुझे ओठ की पाकळ्या ओल्या?
जणु दवांत भिजले फ़ुल
नकळत तुझ्या मी गंध लुटला
सखे, मज ती चुकही कबुल
गंध हा जाहला अनावर
विस्तारल्या जणु दाही दिशा
रोम-रोमातुनीं भिनु लागली
धुंदवेडी ही ओली नशा
बरसतो एक एक सुर अमृताचा
अन, ओठावर विरते गीत
निशब्द हा आलाप छेडीता
बघ सखे, कशी बहरते प्रीत
मग,
का हा लटका राग आणीशी?
का अबोलीचा हा ताटवा?
ये अशी मिठीत जराशी
मजसम खुळा आजचा गारवा
-सचिन काकडे [ मार्च १,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच " हा खेळ सावल्यांचा"