रात्र काळ्या अंबराची सोबतीला चंद्रमा दिसलास राजसा अचानक मज चकोरासारखा II धृ II
शोधल्या कित्येकदा मी परततीच्या तुझ्या खुणा बिलगलास कोठुनी अनामिक मज सुगंधासारखा II १ II
पाहिले तुला समोरी विसरले माझी मला सुचलास गुंतुनी शब्दांतरी मज कवितेसारखा II २ II
दाटली कित्येक होती मेघओली आठवे बरसलास होऊनी सरी मजवरी श्रावणासारखा II ३ II
--
"सुधिंद्र दि. देशपांडे"
"संवेदना" कला अणि मनोरंजन समुह, संचालित
"थर्ड बेल एंटरन्टेंमेंट मराठवाडा विभागात"
©2008 sanvedana arts & entertainment