गा जात्याच गाणं!!
.
एक पाऊल पुढे टाकलं की
मागच उचलावंच लागत!
त्या शिवाय स्थैर्य येत नाही.
आणि दोन पावलं जुळली तरी
थांबता येत नाही.
पावला पावला वर
अडथळे असतील.....
कधी पैंजणांनी जडवशील
कधी मायेच्या दोरीत आडकशील,
कधी उंबर्याशी अडखळशील,
कधी अंगणात घुटमळशील.
घे दिर्घश्वास टाक पुढे पाय
सार्या आभूषणां सहीत!!
कधी कुठे होशील द्वीधा!!
सबला की अबला ?
नको संभ्रम आता.
दुष्टचक्र आहे हे.......
कधी थांबणार नाही.
चक्रावर स्वार तू
आता थांबणे नाही.
उचल पाउलं!!
तोल सांभाळ!!
पुढे गेली बहीण मोठी.
तुज चालणे पाठी पाठी!!
वाट पाहते मागे छोटी,
मशाल आज तुझ्या हाती.
उचल पाय,
धर ताल,
गा जात्याच गाणं!!
परेड चलते रहेंगे चलते चल ||
एक- दो, एक- दो, एक- दो,
परेड आगे बढेंगे आगे बढ ||
एक- दो, एक- दो, एक- दो,
स्वाती फडणीस..........................०८-०३-२००८
जागतिक महीला दिनाच्या समस्त जगाला शुभेच्छा