आमच प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता खुळी
उगाच चरले काल रातरी काहीबाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही
तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे
चपळाई या शब्दाचाही अभाव आहे
भरीस आला प्रसंग आहे बाका हाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...
हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता
हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता
कळून येतो भाव मनातील मग त्यालाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...
अंतरातली उलथापालथ मी बावरते
बंद पाहूनी दार जराशी मी घाबरते
तो थांबून देतो धक्का तेव्हा दारालाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...
............
अन मी निघून जाता तोही निघून जातो
औषध गोळी एक उशाशी ठेवून देतो
मी दमात एका गिळते मग ती गोळी ही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...
मी हसून त्याला म्हणते सोडव रे आणि
डोळ्यांमध्ये हसून माझ्या येते पाणी
दुखू लागले आहे पोटी त्याला ही
उदरी त्याच्या मुळीच काही राहत नाही...
केशवसुमार