(अधिकार)

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल अधिकार

किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे
घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे

कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे
मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे

चार रंगांनी बघा बदले कशी दृष्टी जगाची
आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे

भाव थोडे वेगळे डोळ्यात माझ्या पाहिले अन
लाज थोडी, घाबरे तो काय ही करणार आहे

वाट रुळलेली कशाला चालुया दोघे पुन्हा ही
ह्या  प्रवासाने जगाचे मोडले संसार आहे

मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ?
जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे