कविवर्य ग. दि. मां. ची क्षमा मागून
तोः डोळ्यात घाल माझ्या तू थेंब औषधाचे
त्रासाविना पळावे हे दुःख लोचनांचे धृ.
तीः मी पाहिले जरी ते येते मनात शंका
संसर्ग सहज होतो आहे खराच धोका
हितगूज प्रेमिकंचे दुरूनी करावयाचे ...१
तोः अश्रू जरी गळाले डोळ्यात बोच राही
उघडून नेत्र बघता होतेच लाही लाही
क्षणमात्र आग थांबे जणू थेंब अमृताचे ...२
तीः काट्यासमान जन्मे हे दुःख लोचनी या
आरक्त दृष्टी होई, दृष्टीत रक्तछाया
चढवून कृष्णकाचा, मधुबोल आज वाचे ! ...३