नाव माझे कोणत्या टोळीचे निघाले

 मिलिंद फणसे ह्यांच्या  गझलेला  मानाचा मुजरा करून 
पोहणारे एक जातीचे निघाले
(खंत थोडी की विहीरीचे निघाले)

लाल, भगवे, ते निळेही   आणि हिरवे 
प्यायले ते सर्व काही हातभट्टीचे निघाले..

दाखवावी का फुशारी लेखकांनी?

मासिकांचे भाव रद्दीचे निघाले....
हात धरण्या रे कुणाचा एवढे हे
कागदाचे रीळ नि पाट शाईचे निघाले?
पाहता कविता विडंबावी तयांनी?
हे विडंबक एक जंत्रीचे निघाले
त्या सुरांच्या डोळिया येईल पाणी 
गर्दभीचे गीत जातीचे निघाले
मोह झाला का शोधण्याचा तुलाही ?
नाव माझे कोणत्या टोळीचे निघाले