महेशशेठनी केलेले सुंदर विडंबन झोप आल्यावाचून लोळायचे वाचून आमची झोप उडाली (महेशशेठ, तुम्ही सुद्धा !!) मग जालावरून मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम रचना दिवस तुझे हे फुलायचे शोधणे आले आणि मग पुढचं सगळे नेहमीचेच..गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता..
दिवस जुने ते स्मरायचे
आठवणी काढून हसायचे
रस्त्यात हिंडत जाणे
वाटेत शोध बे दाणे
चकण्यास दाणे ते असायचे
गाठावी मित्राची खोली
जमावी पारटी ओली
ग्लासात वारुणी भरायचे
भरारे ग्लास हे पार
वाटावा सुरे चा भार
घोटात रिकामे करायचे
माझ्या तू घरच्यापाशी
थांबव गाडी जराशी
पायऱ्या चुकून पडायचे