सांगू काय (२)

सांगू काय (१) चा दुवा : दुवा क्र. १ 

एका शहरातील रस्त्यावरचे खड्डे इतके मोठे सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय?

इतके मोठे, इतके मोठे  की,

एखादा माणूस त्यात सहजच मावून जाय! ॥-॥

शहरांतील खड्ड्यांबाबत सरकार एवढे उदासीन सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय?

एवढे उदासीन , एवढे उदासीन की,

 'लीटमस पेपरच' रागा रागाने लाल होवून जाय! ॥-॥