(मोजणी)

आमची प्रेरणा अनिरुद्ध१९६९ यांची कविता मोजणी

हल्ली घरात कोणा वस्तीस नेत नाही
मी ही चुकून सुद्धा जोखीम घेत नाही

आश्वासने जरी ती देऊन काल गेली
मी खातरी तिची पण कोणास देत नाही

सारे तिचे पुरावे जाळून काल आलो
फसलो तरी कसा मी लक्षात येत नाही 

'सत्कार' 'खास' अमुचा झाला कशा कशाने
मज मोजदाद त्याची अजिबात येत नाही

देहास पार अमुच्या सुजवून ठेवले की
ऐन्या पुढे स्वतःला इतक्यात नेत नाही

मी श्वास घेतला की मज वास येत नाही  
माझा सुगंध आता इथल्या हवेत नाही

सांगून "केशवा"ला काहीच फायदा ना
शाबूत हाड कुठले ह्याच्या जिभेत नाही