भडंग

  • चुरमुरे ८ वाट्या
  • शेंगदाणे १ वाटी, खोबऱ्याचे पातळ काप १ वाटी
  • मेतकूट ४ चमचे, लाल तिखट १ चमचा, धने पूड १ चमचा
  • जिरेपूड १ चमचा, काळा मसाला १ चमचा,
  • मीठ १ चमचा, पिठीसाखर १ चमचा, पाव वाटी तेल
  • फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग,हळद
१५ मिनिटे
२ जण

पाव वाटी तेलात मेतकूट, लाल तिखट, धने पूड, जिरे पूड, काळा मसाला, मीठ व साखर घालून मसाला कालवून घ्या व तो सर्व चुरमुऱ्याना लावा. नंतर नेहमीप्रमाणे तेलाची फोडणी करून त्यात शेंगदाणे व खोबऱ्याचे पातळ काप घालून लाल रंग येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. परतून झाल्यावर त्यामध्ये मसाला लावून तयार झालेले चुरमुरे घालून परत एकसारखे ढवळा.  कोल्हापुरी पांढरे शुभ्र टपोरे चुरमुऱ्यांचे भडंग चविला जास्त छान लागतात.

नाहीत

सौ आई