ए माझे संजीवनी
ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही ।
अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा ।
तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा ॥ धृ ॥
ते कटाक्ष, ती चपळाई अन् ।
जी तुझ्यात असे, नसे कुठे ॥
ती कला मनास मोहवी ।
जी तुझ्यात असे, नसे कुठे ॥
मी तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात पावलो सर्व जगा ॥ १ ॥
तू मधुर जे बोल बोलशी ।
हसून जराही सुंदरी ॥
तर अजूनही स्पंदने ।
नशेत धुंद रंगती ॥
ए परी, ए परी, मी तुझा कायमच ग खुळा ॥ २ ॥
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०३१५
हा अनुवाद शब्दशः केलेला नाही.
पण चाल ओळखलीत तर मूळ हिंदी गीताची आठवण अवश्य करून देईल.
मात्र चाल ओळखावी लागेल. अर्थातच मूळ गाणेही.