पाऊल नाद की विनाश वाटेवरील मृत्युगीत?
ही आपुलीच वाजती पाउले. मागे आपुल्याच कर्माची भुते.
जेव्हा वाळुनीया गेले श्रावणी पाऊस ओले
जेव्हा जाळाया लागले उन्ह शिशिरी कोवळे
नाद मंदसे भासले मूढ मानव बोलले
वाजे पाऊल आपले म्हणे मागे कोण आले?
कॅलास पाषाणले गंगातीर पुरावले
पाणी धरीत्री सांडले आणि आभाळी हरवले
नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले
वाजे पाऊल आपले ऍका निसर्ग कण्हले
रान रहाया कापले ताव करून जाळले
दोन्ही करांनी लुटले नाही थोडेही फेडले
नाद चहूकडे आले जग बहिरे झोपले
वाजे पाऊल आपले गाणे उन्मत्त गायले
वारे काजळी माखले तारे नभीचे झाकले
सारे प्राण घुस्मटले जारे संचित संपले
नाद तीव्र ठणाणले कोठे लुटणारे गेले?
वाजे पाऊल आपले कोणी ऍकाया ना उरले
**************************************************