केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...(एक नवविडंबन)

आमची प्रेरणा चैत्रेचैत यांची एक नवीकविता सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका...

केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...

विश्वजालावर कधीतरी केश्याने एक विडंबन पाडले...

नंतर दुसरे, नंतर तिसरे...

असे करत करत सर्व कविता फाडून संपल्या. एकही कविता फाडायला शिल्लक राहिली नाही...

मग त्याने विचार केला की ह्या पाडलेल्या विडंबनांचे परत विडंबन करूयात.

तेवढ्यात त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर'

म्हणून तो जांभई देत ऑफिसचे काम करायला निघून गेला...