पुराण कथांमधे पारिजातकाच्या झाडाचा एक संदर्भ आहे.. कृष्णाची राणी सत्यभामा हिला तो वृक्ष चिरतारुण्य प्रदान करतो अशी काहीतरी... त्यावरून एक कथा आठवली..
गुगली' नावाचं एक पुस्तक आहे सुबोध भावे यांचं त्यात ही कथा आहे..दोन मित्र असतात त्यातला एक मित्र अरुणाचल प्रदेश सारख्या दुर्गम ठिकाणी जातो तेथील लोकांची जीवनशैली अभ्यासण्यासाठी... तिथे गेल्यावर त्याच्या नजरेस एक जमात पडते ज्यातील लोक कधी म्हातारेच होत नाहीत...त्यांना मृत्यु हा केवळ अपघाताने अथवा रोगामुळे होतो.म्हातारपण हा प्रकारच नसतो...ते लोक खात असलेल्या काही वनस्पतींचा तो अभ्यास करतो अणि कायम चिरतरुण ठेवाणारे असे एक औषध तो शोधून काढतो..उंदरावर त्याचा प्रयोग करतो..आणि नंतर त्याच्या मित्राला कळवतो की मी सगळे संशोधन नष्ट केले आहे ...
ज्या उंदरावर प्रयोग केला त्याला काही दिवसात कळाले की आता काही आपण म्हातारे होत नाही..मग त्याची जिगिषाच संपुन गेली...असेच काहीतरी त्या जमातीचे सुद्धा झाले..अत्यंत आळशी अणि अकार्यक्षम अशी जमात निपजली...
आपल्या कुठल्याही लगबगीमागचे खरे कारण हे " वेळ माझ्या हातातुन निघुन जात आहे" ही भीतिच आहे...आपण आत्ता जर काम केले नाही तर कदाचित पुन्हा संधी मिळणार नाही हि भीतिच हितकारक आहे.. मी अमर आहे असे वाटले तर
आज करे सो कल
कल करे सो परसों...अशीच वृत्ति निर्माण होते.
पण.... जर खरचं मानवाला चिरतारुण्याचे वरदान लाभले तर ???
ते वरदान ठरेल की शाप ??