रस्ता-२

अभ्यंकरशेठना शेवटी कुठला रस्ता मिळाला हे बघायला गेलो आणि आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो..

आज तुम्ही तोंड का हे झाकले?
काय म्हणता शेण आहे फासले!

ती कधी आली न येथे एकटी
सोबतीला तात, बंधू आणले 

मी कशाला सांग बोंबलतो असा?
या बघाया मज कशाने तिंबले

लग्न कर वेळी अवेळी सांगते
(काय मजला वेड आहे लागले?)

मी तसा होतो सुखी बघ एकटा
येव्हढे पण सुख मला ना लाभले!

या पसाऱ्याचे करावे काय मी ?
कोपरे सारे घराचे संपले 

काय हा रस्ता तरी तू शोधला
'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले

शेवटी ते "केशवा"गत वागले
शेवटी त्यांनी विडंबन पाडले!

सांग तू "केश्या" मला हे एकदा
तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले?

केशवसुमार