श्वास घ्यायला सुद्धा इथं टॅक्स द्यावा लागेल...
तू जीवनात येऊन गेल्यापासून
तेच तर करती आहे मी
हसण्यावर टॅक्स दिसण्यावर टॅक्स
बोलण्यावर टॅक्स आणि चालण्यावरही टॅक्स
हो.... पाऊल वाकडं पडू नये म्हणून काळजी घ्यायची, त्यावरही टॅक्स
कुठंतरी तिसरीकडंच मन भरकटू लागलं,
की त्याला समेवर आणायला त्रास स्वतःच घ्यायचा, आणि टॅक्स ही स्वतःच भरायचा...
मोकळेपणावर टॅक्स, आनंदावर टॅक्स
दुःख तेवढं मात्र टॅक्स फ्री झालंय आता...
तुझ्या बरोबरच्या चार क्षणांची
ही केवढी मोठी किंमत मोजती आहे मी
की अगदी माझ्याच श्वासांवर आता टॅक्स लागू लागलाय....
आणि म्हणूनच त्या श्वासांचंही ओझं झालंय मला...