(कधी)

मिलिंद फणसे यांची कधी  ही कविता वाचून आम्हाला आम्ही कधी कधी काय काय कारतो ते आठवलं

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी  कधी ?

रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी

हा निरागस चेहरा, हासता मनमोकळे
वाटते चढली कुठे, वाटते  चढली कधी

ती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधी

लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा
पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?