(जीवघेणे)

आमची प्रेरणा मिल्याची सुंदर गझल जीवघेणे

रेकते रेड्याप्रमाणे! जीवघेणे
का असे म्हणतेस गाणे! जीवघेणे

नाव ओठांवर कुणाचे घेतले मी
आमचे चुकले उखाणे जीवघेणे

एक तर गिरवायची शेणात नावे
आणि वासाचे बहाणे जीवघेणे

'कबुतरां'ना पाहणा गेलो खरे पण
भेटले भलते ससाणे जीवघेणे

चालतो मी आज येथे हे असे का?
पाडले होते उताणे जीवघेणे

तिंबले कणके परी मजला कशाला?
रोजचे हे मार खाणे जीवघेणे

बायकोला खण उघडताना मिळाले
आमचे काही पुराणे जीवघेणे

शब्द सारे संपल्यावर संयमाचे
काढले आमचे घराणे जीवघेणे