आषाढ

आषाढ

हा वारा, आधी असा नव्हता...

आज खिडक्याही, जरा जास्तच मोकळ्या वागतायत.

आभाळानं मनाशी ठेवलेलं सगळं आज सुटं करून टाकलंय

अनिर्बंध

हलक्या गारव्यापाठोपाठ अनोळखी अस्वस्थता यायलाच हवी का ?

दिसेल तिकडे दिसेल तिथंपर्यंत पसरलेले ढग ...

अंधारून गेलेली स्तब्ध दुपार...

का कुणास ठाऊक,

 

आज खूप बोलावंसं वाटतंय


-- मौनी