असती नितळ इतके चेहरे

असती नितळ इतके चेहरे

उडे जेव्हा जेव्हा बट ती तुझी रे
उडे जेव्हा जेव्हा बट ती तुझी रे

उडे जेव्हा जेव्हा बट ती तुझी रे
कुमारिकांचे मन उसळे, माझ्या सजणा

असती नितळ इतके चेहरे
तर त्यावर का नजर न उतरे, माझे सजणे

ऋतू प्रेमालापाचा आला
की बोरींवरची बोरे पिकली, माझ्या सजणा

कधी इकडेही कर तू फेरी
की वाट पाहून डोळे थकले, माझे सजणे

त्या गावात वसू मी कशी रे
की जिथे प्रियतम राहतो, माझ्या सजणा

पाणी आणण्यासाठी तू ये ना
की तुझा माझा एक रस्ता, माझे सजणे

चंद्र पाहतो म्हणून तुज पाहू
तू छतावर ये ना गं सये, माझे सजणे

आता मुलगे शेजारचे चिडवतील
हा चंद्र मेला, निघून जाऊ दे, माझ्या सजणा

तुझी चाल आहे नागिणी जैशी
गारुडी तुला घेऊन जातील, माझे सजणे

जावो कुठेही मी माझे सजणा
हृदय तुला देऊन जाईन, माझ्या सजणा

ओ, मन घेऊन, दगा देतील,
प्रियकर हे तर स्वार्थाचे,
हे देतील तर काय देतील

दुनियेला दाखवून देऊ
प्रियतमांच्या श्रमासाठी,
आम्ही रक्ताचे पाट वाहवू

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६१२

"नया दौर"च म्हणावा लागेल अशा, खूप जुन्या चित्रपटातले हे गीत आहे.
पंजाबी ठसक्याचे हे गीत मराठीतही म्हणता येईल.
किंचित रसनाकसरत (टंगट्विस्टींग) करायला झेपली तर.

प्रश्न नेहमीचाच. मूळ हिंदी गीत ओळखा.