प्रतिशब्दकोश

मुळ शब्द सुचवणी १ सुचवणी २ संदर्भ          
ऍक्सिलरेशन त्वरण संवेग http://www.manogat.com/node/2460
फ्रेम ऑफ रेफ्रन्स संदर्भ चौकट
ऍंगल ऑफ बॅंकिंग आंतरउतरणीचा कोन
अँग्युलर कोनीय
डिस्प्लेसमेंट विस्थापन
मोशन चाल
स्पीड गती
व्हेलॉसिटी वेग
सेंट्रिफ्युगल अपकेंद्री
सेंट्रिपेटल अभिकेंद्री
कर्व्हिलिनीअर वक्ररेषारूप
डायमेन्शन्लेस मितीहीन
इनर्शिया जडत्व
इन्स्टंटेनिअस तत्क्षणिक
इंटरॅक्शन अन्योन्यक्रिया
लीनिअर रेखीय
मॅग्निट्यूड परिमाण
मोमेंट आघूर्ण
नोर्मल लंब
स्यूडो आभासी
क्वांटिटी राशी
रेडियल त्रिज्य
रेक्टिलिनिअर सरळरेखी
रोटेशनल घूर्णन
रेसोल्युशन वियोजन
स्पीन आभ्राम
 टॅंजेंट स्पर्शिका
जनरेटर जनित्र
ट्रान्सफॉर्मर रोहित्र
स्टॅटीक इलेक्ट्रीसिटी स्थैतिक विद्युत
स्टॅटीक इलेक्ट्रीसिटी स्थैतिक विद्युत
व्होल्टेज विभवांतर 
फोर्स बल
पोटेन्शियल विभव
पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर
इलेक्ट्रिक करंट विद्युतधारा
रेझिस्टन्स रोध
चार्ज भार
मॅग्नेटिक चुंबकीय
मॅग्नेटिज्म चुंबकत्व  

श्री. तो ह्यांनी मराठी शास्रीय शब्द कोष (नोड २४६०) ३० जुलै २००५ ला दिला होता. तेथून तो कॉपी पेस्ट करणे तर सोपे आहे व त्यात मी काही मोठे कार्य केले आहे अशातला भाग नाही. नंतर त्यावर आलेल्या प्रतिसांदापैकी अनू व नंदनच्या प्रतिसादांतल्या शब्दांची भर घातली व हा तक्ता तयार केला.

तक्ता एकदा कॉपी पेस्ट केला की त्यात फक्त एकदाच Html फेरफार करता येतात असे लक्षात आले.  म्हणूनच संदर्भाच्या ठिकाणी लिंक उमटली आहे. Html फेरफार एकदाच करता येत असल्याने तक्त्याचे रकाने वाढवता आले नाही.
प्रशासकांनी काहीतरी काडी (जादूची) फिरवल्यास ह्या तक्त्यातल्या रकान्यांची संख्या वाढवता येईल. ४/५ मनोगतींनी मिळून हे तक्ते भरण्यास सुरूवात केल्यास महिन्याभराच्या आतच आपण मराठी शब्दांवर जी चर्चा केली त्यातले शब्द एकत्रीतरित्ये आपल्याला बघता येतील.

प्रशासकांना तशी सोय करावयाची झाल्यास मी येथे लिहीलेले हे भारुड मिटवून त्यांनी तसे करावे ही नम्र विनंती.
बघा काही जमवता आले तर.