(दृष्टिक्षेप)

'अंजली'ला लावलेली टेप आहे
गॅसवर सध्या जुना 'निर्लेप' आहे

रोज कविता चोरल्या काही नव्या मी
पायरट मी खास - जॉनी डेप आहे

बाटल्या उघडून बसलो सर्व तरिही
"ग्लास सुकले", त्यांस हा आक्षेप आहे!

ना करीना, मल्लिका, प्रीती, बिपाशा
'ऍश' आणिक 'कॅश' - दृष्टिक्षेप आहे?

पाडताना काव्य मी थांबू कशाला?
दोस्तहो, पहिली न माझी खेप आहे

===================================================

१. पायरेट्स ऑफ दि कॅरिबिअन हा लोकप्रिय इंग्रजी चित्रपट आणि त्याचा नायक जॉनी डेप (कॅप्टन जॅक स्पॅरो) हा संदर्भ

===================================================

प्रेरणाः मिलिंद फणश्यांची झेप