(माझ्या रचना)

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची माझ्या रचना 

नेहमीची लावलेली टेप आहे
डोंबलाची त्यात कसली झेप आहे?

कल्पना का शोधल्या नाही नव्या मी
वाचकांचा नेहमी आक्षेप आहे

कोवळ्या वाचून माझ्या सर्व कविता
"वृत्त चुकले", त्यांस हा आक्षेप आहे!

बायको ना बाप, ना दारू, न लफडी
हे विडंबन केव्हढे निर्लेप आहे!

प्रसवता मी हे विडंबन विव्हळलो ते
"केशवा", केलास मेल्या 'रेप' आहे