कालच्या स्वप्ना.....

कालच्या स्वप्ना आजही ये ना

प्रियकरास संगे घेऊन ये ना.........

आजचा दिनही  मधूर आहे

मनाची बासरी वाजत आहे

नेत्रांच्या किनारी, प्रितीच्या पथावरी

माघारी ये आता तरी, साजणा

मी ही ऐकवीन माझ्या हृदयाचा तराणा.........

विहरती ढग, गाती झोपाळे

आज कोणास शोधताहेत

आज मलाही दर्शन दे ना......

माझ्या नगरीत येरे रसिका

वाटेकडे तुझ्या लावून नयना

हृदयात ठेवून , नेत्रांत लपवून

जन्मोजन्मीची त्रुष्णा भागवीन

तुला मी शिकवीन प्रीत निभवण्या

कालच्या स्वप्ना आजही ये ना......

मंडळी, आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात, तसा या ही गीताला द्यावा. या वेळी गाण्याच्या शब्दांबरोबर

चित्रपटाचे नाव आणि गाणाऱ्या कलाकाराचे नाव ही ओळखा.