मौन

मौनाचा अर्थ -

कुणी 'हो' घ्यावा, कुणी 'नाही' घ्यावा

इतकंही अस्मिताहीन नसतं ते!

पण अर्थ लावणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येऊन

मौन पाळतं मौन.

शब्दांच्या व्यक्त रूपातच तर

'ध' चा 'मा' होऊन घात होतो

म्हणूनच स्वतःला शब्दात व्यक्त करणं

टाळू पाहतं मौन.

इंटरप्रिटेशन वा मिसइंटरप्रिटेशन

याचा मुलाहिजा न बाळगता...

अर्थ लावणाऱ्यांच्या 'इंटरप्शन' चा त्रास करून न घेता

अन योग्य अर्थाची आशाही न ठेवता

केवळ मौन !!!