पुन्हां एकदा ढगांना येतो प्रेमाचा उमाळा,
सृष्टीच्या अंगावर हिरवाईच्या नाना कळा..
पर्वत शिखरांना लागतो ढगांचा लळा,
कभिन्न कातळही होतो लेकुरवाळा..
श्रावणसरींच्या अगणित मुक्तामाळा,
लहरतो, शहारतो आनंदाचा मळा..
मोहरलेल्या मनाला स्वप्नांचा चाळा,
मनामध्ये घुमतो कृष्णाचा घुंगुरवाळा...