तूझी आठवण....
रणरणते उन
खिन्न दुपार
स्तब्ध आसवे....
सांजेची रानभूल
घुमणारी शिळ
नकोसा चकवा....
घोंघावत्या लाटा
सैरभैर किनारा
सरणारी वाळू....
डुबता सूर्य
एकाकी क्षितिज
उध्वस्त आभाळ....
कोसळता पाऊस
न संपणारी वाट
थकलेली पावले....
रोधलेला श्वास
दाटलेला हुंदका
उदास कातरवेळ....
कोरी सेज
स्पर्शाचा झूला
निसटती चाहूल....
भग्न पहाट
उजाड स्वप्ने
धगधगती गात्रे....
शीला.