काळ थांबला कधी का..

माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन काळ थांबला कधीचा या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केला होता. खालील कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असू शकेल.

मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे..
मन आनंदस्वरूप, दुःख केवळ आभास.

प्रेम सांगेल तुजला पुन्हा प्रेमाची महती..
दगा करू नये याचा तुला घडला अभ्यास.

वेड्या, वादळ शमले, पुन्हा बांधूया डोलारा..
मायबापाच्या कुशीत पुन्हा अंकूरती श्वास.

काळ थांबतो कधी का, त्याचा अनंत प्रवास..
फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला 'तो' भास.

मुमुक्षू