२ कविता

१]  सळसळणारे ते आत कुठेसे काही
     उसळून उरी वेगात कुठेसे काही
     घेऊन जिवाची कासाविसता सारी
     ते जिवंत येती भास कुठेसे काही !

२]  बोलून कधीचे झाले
     मिटली डोळ्यांची भाषा
     तू तरंग होउन ये ना
     ओढू पाण्यावर रेषा !