भारत... होईल का पूर्वीसारखा परत?

भारत ...

     झालाय समस्यांनी गारद!  झालाय समस्यांनी गारद!

महागाई ...

       देशाला पोखरत जाई! देशाला पोखरत जाई!

बॉंबस्फोट ...

        दाखवी कुणाकडे बोट? दाखवी कुणाकडे बोट?

दहशतवाद ...

       रोजच करतोय घात! रोजच करतोय घात!

अपघात ...

      करी तनमनावर आघात! करी तनमनावर आघात!

अत्याचार ...

      बनलाय रोजचा आचार! बनलाय रोजचा आचार!

दगडफेक ...

     करी एकतेचे तुकडे अनेक! करी एकतेचे तुकडे अनेक!

अभिनेत्री ...

      लावताहेत कपड्यांना कात्री!  लावताहेत कपड्यांना कात्री!

नेते ...

      कधीकाळी प्रामाणिक होते! कधीकाळी प्रामाणिक होते!

खेळाडू ...

    खातात पैशाचे लाडू!  खातात पैशाचे लाडू!

जनता ...

      वाढवी लोकसंख्येची घनता! वाढवी लोकसंख्येची घनता!

सुबत्ता ...

      राहिली नाही आता!  राहिली नाही आता!

चित्रपट ...

     चालण्यापेक्षा पडतात पटापट!  चालण्यापेक्षा पडतात पटापट!

धनदांडगे ...

      झालेत लोकशाहीला बोटावर नाचवणारे लांडगे!  झालेत लोकशाहीला बोटावर नाचवणारे लांडगे!    

बहुमत ...

      सिद्ध करायला लागते नोट!  सिद्ध करायला लागते नोट!

शेतकरी ...

      आत्महत्यांची वाट धरी! आत्महत्यांची वाट धरी!

बेकारी ...

      पळवी तोंडाची भाकरी!  पळवी तोंडाची भाकरी!

 पैसा ...

      झालाय देवा जैसा !!!  झालाय देवा जैसा!!!  झालाय देवा जैसा!!!

 भारत ...

    होईल का पूर्वीसारखा परत?

    होईल का पूर्वीसारखा परत?

    होईल का पूर्वीसारखा परत?