एकसंध समाजाची 'देव-घेव'

भाषा, गणीत व तंत्रवीकास ह्या तीन गोष्टी सामाजीक वीकासात मोठा हातभार लावतात. सामाजीक वीकासानेच घराघरात सूख-संम्रूद्धी येवू शकते.मराठी समाजाला सूख-संम्रूद्धी हवी असेल, जपायची असेल तर वीकासाचा आलेख चढताच ठेवायला हवा.   वीकासासाठी वर सांगीतलेल्या तीन गोष्टीवर एकसंध समाज होवून, नैपूण्य मीळवावे लागेल. मराठी समाज एकसंध होण्यासाठी त्यांची आपआपसातील देवाण-घेवाण प्रक्रीयेला एक शीस्त ही आणावी लागेल.

१) काहीतरी हवं असेल तर काहीतरी द्यावं लागतं..... पैसा हे चलनीरूपच देवाण-घेवाणीसाठी योग्य असतं. (पण ते एकच रूप असू नये. दूसरं रूप कोणते असावे तेही स्पष्ट व्हावयास हवे. )

२) 'देव-घेव' करताना तीसऱ्या कोणालातरी साक्श ठेवावं लागतं. ( ही तीसरी व्यक्ती एखादी सामाजमान्य संस्था असू शकते.)

३) ह्या तीसऱ्या व्यक्तीला/ संस्थेला काहीतरी/ कसलातरी मोबदला दीला जायला हवा. ( एकतर पैसा वा दूसरे पैशाव्यतीरीक्त म्हणजे समजा - एक गूणांकन पद्धतीद्वारे त्या व्यक्तीच्या खात्यात गूण जमा व्हावेत. अधीक गूणांना 'पूण्य' व वजा गूणांना 'पाप' म्हटलं जावू शकतं)

हे सगळं वीशयांतर वाटत असेलही पण हे यासाठी की समाज म्हणून जो पर्यंत आपल्यामध्ये 'देव-घेव' होत नाही, व त्या देव-घेवीचं समाजमान्य संस्थेला कूठलाही फायदा होत नसेल तर वीकास होणार कसा? हे स्पष्ट करण्यासाठी हे मी लीहीले आहे.

हे झालं एकसंध समाज ह्या संकल्पनेबद्दल!

आता भाषेची सध्याच्या गरजे बद्दल बोलूया. गणीत ह्या वीशयाला जीथं शेवट होतो तीथून भाषा हा वीशय चालू कसा होतो आता आपण सारांशात पाहूया. अमेरीकन संगणक शास्त्रज्ञांनी 'डाटा एनकोडींग' हे तंत्र वीकसीत केलं नीव्वळ तर्काच्या आधारे. म्हणजे 'A', 'B', 'C', 'D' ह्या अल्फाबेटस ना, वर्णाक्शरांना (मूळाक्शरांना नाही)  व काही गणीती चीन्हांना क्रमानूसार अंक दीले. उदाहरणार्थ--- 'A' ला ११ तर 'B' ला १२ इत्यादी. हे सगळा उपद्व्याप अशासाठी, कारण संगणकाला जेव्हा १२ व ११ अशा क्रमांकांचा आदेश दीला की तो त्याला शीकवीलेल्या पद्धतीने 'BA' ही वर्णाक्शरे आपल्या समोर सादर करतो.

ईथूनच पूढे गणीत, भाषा व तंत्र यांचा सूरेख मेळ इंग्रजीच्या बाबतीत साधला गेला. आधूनीक यूगात या गोष्टींच्याच्या एकत्रीत परीणामाने इंग्रजी संम्रूद्धी देणारी भाषा ठरत गेली. इंग्रजी भाषा ज्या रोमन लीपीचा वापर करते त्या लीपीतील मर्यादीत असणाऱ्या चीन्हांच्या संख्येमूळे संगणकाला आज्ञा समजवून घेणं सोपं झालं होत.

मराठीच्या बाबतीत इथेच अडचण येत आहे.

'क्र', र्ब, द्य, क्ष. ज्ञ श्र ए, ऐ

इत्यादी चीन्ह ही जोडाक्शर चीन्ह म्हणून त्यागली न जाता, परंपरा म्हणून धरून ठवली जात आहेत. भाषाशास्त्री वा व्याकरणकार या (व अजून काही) बाबतीत आपला हट्ट जर सोडतील, तर तंत्रज्ञांना मराठी भाषेसाठी 'डाटा एनकोडींग' पद्धती वीकसीत करणं सोपं जाईल. ह्या बाबतीत जे गणीतीतज्ञ मंडळी आहेत, त्यांनी पूढाकार घ्यायला काय हरकत आहे?

काही (अ)क्शरचीन्हं (व्यंजनचीन्हं), स्वरचीन्हं, जोडाक्शरचीन्हं टाळण्याने मराठी समाजात संगणकाचा सार्वत्रीक वापर होणार असेल व तसे होण्याने सूख-संम्रूद्धी येणार असेल तर तसे का करू नये?

काही जण म्हणतील, की 'यूनीकोड' आहेना? मग हे उपद्व्याप कशासाठी?

माझं असं म्हणणं आहे की 'यूनीकोड' ने मराठीतून आज्ञावली लीहीता येणार का? 'यूनीकोड' ने मराठी भाषीकांनी स्वतःच्या भाषेपेक्शा इंग्रजीचाच वरचश्मा का ठेवायचा? अगदी तसेच, व्याकरणाच्या बाबतीत संस्कृतचा वरचश्मा मराठीवर का ठेवायचा? आपण आपली मराठी भाषा 'एक्सप्लोअर' (बघा! हा वीचार व्यक्त करतानाही मला इंग्रजीचाच उपयोग करावा लागतोय. ) कधी करणार?   तीच्यात सूद्धा अनेक केपेबीलीटी नक्कीच असतील.

आता समारोपात एक उदाहरणः

ओंकार जोशी या मराठी तरूणाने मराठीच्या प्रेमाखातर 'गमभन' हा एडीटर ऑफलाईन कामासाठी मराठीतून यूनीकोड माध्यमातून टंकन करता यावे यासाठी सामान्यजनांना उपलब्ध करून दीला. तोही मोफत. ओंकारने मराठी समाजाचा सदस्य म्हणून आपली जबाबदारी आपला मीत्र मयूरेश वैद्य यांच्या माध्यमातून  आपल्या द्न्यानाच्या जोरावर पार पाडली.

आपण ती गमभन टंकन प्रणाली गरजेमूळे मोफत घेतली. ईथं काहीतरी चूकीतय असं नाही का वाटत?

जर एकसंध समाजाचे प्रतीनीधत्व करणारी एखादी संस्था असती व तीच्या माध्यमातून जर अशा वीवीध गोष्टी मीळू शकल्या तर त्या संस्थेलाही काही मोबदला देता आला असता. त्या संपत्तीचा वापर इतर अनेक वीधायक कामासाठी वापरता येईल. वा समजा ओंकार सारख्याच कूणाला अजून संशोधन करून मराठी साठी काही करायचे असेल तर ती वापरताही येईल. सामान्य मराठी माणसालाही 'आपण फूकटे आहोत' असं नक्कीच वाटणार नाही.

अशा प्रकारे एकसंध समाज होवून व्यवहार वाढला तर मराठीचा वीकास नक्की होईल.

- सतीश रावले