दुनियेतल्या उपवनी बहर हा चार दिन

दुनियेतल्या उपवनी बहर हा चार दिन

दुनियेतल्या उपवनी बहर हा चार दिन| पाहून घ्या ह्याची करामत चार दिन ||धृ||

लाख दारा अन सिकंदर प्रकटले| आज सांगा, सर्व ते गेले कुठे ||
उचकी आली मृत्यूची अन संपले| हरेकाचा हा निवारा चार दिन || १ ||

कालवर रंगीत बहार होती इथे| आज कुठवर रडत पाहू त्या खुणा ||
रंग हे आकाश बदले हर घडी| दु:ख ऐसे, पाहता दो चार दिन || २ ||

लाभ कुठला मोडुनी मन कुणाचे| तुटल्या जिवांना जोड तू, अन घे दुवा |
जा! परंतु सोड काही याद आपली| होवो तुझी दुनियेत चर्चा चार दिन || ३ ||

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०१२३

मूळ हिंदी गीत ओळखा.