तुज ठाऊक नाही...

तुज ठाऊक नाही आठवणीत तव केव्हढी रडले, केव्हढी रडले
शांत तू निजलास तेधवा तारे मी गणिले, केव्हढी रडले  ।ध्रु।

कळ्या किती बागेत उमलल्या, उमलून कोमेजल्या
विरहिणीच्या या मनास भोळ्या, समजावून गेल्या
व्यतिले यौवन रडत जयांनी प्रीतबीज पेरले, केव्हढी रडले  ।१।
तुज ठाऊक नाही...

किती मेघ आकाशी जमले, जमुनी नाही बरसले
मेघ प्रीतिचे हृदयांतरी ते तरसले, तडफडले
दुःख जाणते हृदयच माझे वा डोळे हरवलेले, केव्हढी रडले  ।२।
तुज ठाऊक नाही...

  1. हे कोणत्या हिंदी चित्रपट गीताचे भाषांतर आहे ते ओळखा.
  2. चाल -> मूळ गाण्याची. (शक्यतो.  कारण मूळ गाणे अत्यंत कर्णमधूर असले व सोपे वाटत असले तरी त्याची लय, वृत्त किती अवघड आहे हे भाषांतर करताना जाणवले. )
  3. भाषांतरातील चुका जरूर सांगा.  सुधारणाही सुचवा.