एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

आपण मराठी माणसं तशी चांगलीच असतो पण तरीही आपापसातील सौहार्दाची / सहकार्याची भावना ह्याची १००% भरवशाची नसते. माझा जन्म महाराष्ट्रातच झाला व शालेय शिक्षण इ. सुद्धा महाराष्ट्रातच झाले. पुढे कर्मधर्म संयोगाने मी मध्य प्रदेशात गेलो व तिथलाच झालो. मी माझ्या आईला म्हणालो, 'अग तिथली माणसे फारच चांगली आहेत;एकमेकांना मदत करतात'. त्यावर माझा बाबांचे उत्तर असे; ' अग जा गं,  तो तुला सांगतो आणि तू ऐकतेस, असे कधी होत काय?'  मराठी माणसांवरचा ठाम विश्वास (!) त्या शब्दामध्ये  व्यक्त होत होता. पण तरीही मी तिथेच राहिलो. आणि माझा मराठी माणसांचा अनुभव तसाच सकारात्मकच राहिला होता.  सध्या काही महिन्या पूर्वी मी परत महाराष्ट्रात आलो आहे आणि माझा मराठी माणसांचा अनुभव तसाच आहे. माझ्या मते जिथे मराठी माणूस सीमित संख्येत आहे तिथे तो फारच सुसंघटित आहे. पण महाराष्ट्रात मात्र  दुहींचा गुणाकार आहे. जेथे जाल तेथे भांडण तटा आहेच.
जेव्हा दोन अनोळखी मराठी माणसे भेटतात तेव्हा ते एक तर हिंदी मध्ये संभाषण करतात व काहीश्या संशयाने वा खत्रुडपणाने वागतात (उदा. रेल्वे ट्रेन मध्ये प्रवासी मराठी सौजन्य इ. ) याच्या बरोबर उलट अन्य भाषिक आपल्या बांधवांशी सलोख्याने  वागताना दिसतात.
सरते शेवटी हा प्रश्न राहतो की मग याचे उत्तर काय?  महाराष्ट्रा बाहेरच मराठी माणूस नीट नेटका मिळून मिसळून राहतो व महाराष्ट्रा मध्ये त्यात भांडखोर राक्षस संचारतो की काय? असे असेल तर आपण मुंबई सह समस्त महाराष्ट्र अन्य भाषिकांना देऊन टाकवी आणि अन्यत्र जावे. जिथे आपण सुसंस्कृत पणे वागू. एकीने राहू.