पृथ्वीय हवामान आणि चंद्र


मनोगत सुरू झाल्यापासून मनोगतींनी विविध विषयांवर अतिशय उत्साहाने मराठीत लेखन सुरू केले. मराठी संकेतस्थळ म्हटल्यावर जे काही ठराविक पद्धतीचे संकेतस्थळ नजरेसमोर येते त्या कल्पनेत ह्या उत्साहाने निश्चितच सुखद परिवर्तन झालेले आहे.


शास्त्रीय आणि तंत्रवैज्ञानिक विषयांवर मराठीतून लेखन करणे हे दुहेरी कष्टाचे असते. लेखक मूळ विषय आणि मराठी लेखन ह्या दोन्ही विषयांत जाणकार असायला लागतो. शिवाय ह्या दोन्ही आघाड्यांवर वाचकांच्या अपेक्षा आणि पूर्वकल्पना वेगवेगळ्या असल्याने दोघांनाही समाधान देणे जास्त आव्हानात्मक होते. भाषा सोपी करावी तर विषयाच्या शास्त्रीय बिनचुकतेला बाधा येते. विषयाचे विवेचन निर्दोष करायला जावे तर कित्येक शब्दांना प्रतिशब्द नसल्याने, कधी मुद्दाम शब्द तयार करावे लागल्याने भाषा बोजड होण्याचा धोका असतो.


वरदा ह्यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले आहे असे वाटते. पृथ्वीच्या वातावरणावर, पर्यावरणावर होणारा चंद्राचा परिणाम त्यांनी मोठ्या कौशल्याने अतिशय परिश्रमपूर्वक येथे सादर केलेला आहे. हे करताना त्यांनी बोधकता आणि रंजकतेचा सुंदर समतोल साधलेला आहे. हे सर्व लेख वाचता यावे म्हणून आम्ही विशेष योजना केलेली आहे. वाचकांना ती सोयीस्कर वाटेल असे वाटते.


प्रशासक