अहमद फराज - दुःखद निधन

परवा, २५ ऑगस्ट रोजी, इस्लामाबादामध्ये आजच्या काळातील सर्वोत्तम उर्दू कवीपैकी एक, श्री. अहमद फराज ह्यांचे प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या ७४व्या वर्षी दुःखद निधन झाले. फैज अहमद फैज ह्यांचा वारसा सांगणाऱ्या फराज ह्यांचेही फैजप्रमाणेच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांशी कधीच पटले नाही. रिवायती रोमँटिक गझलांसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या शायराने पाकिस्तानातील राजकीय स्थितीवर व तेथील हुकूमशहांनी सामान्य माणसांच्या केलेल्या गळचेपीवर देखील अनेक कविता केल्या. (ह्याचे उत्तम उदाहरण आहे त्यांची कविता मोहासरा). त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. काही वर्षे देशत्याग करून युरोप, इंग्लंड व कॅनडात राहावे लागले. त्यांच्या काही प्रसिद्ध रचना आहेत :

  1. रंजिशही सही, दिलही दुखाने के लिये आ
  2. अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमें मिले
  3. तेरी बातेंही सुनाने आये
  4. कठीन है राहगुजर, थोडी दूर साथ चलो

त्यांच्या गझला व कविता इथेइथे वाचा. विकिपिडियावर त्यांचा परिचय इथे आहे.
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. अल्विदा, फ़राज़साहब...