आयुष्य

प्रत्येकाचं आयुष्य असतं

खूप काही शिकण्यासाठी

शिकता शिकता स्वतःच एक

अस्तित्व निर्माण करण्यासाठी

मरताना वाटलं

आयुष्य नुसतंच वाहून गेलं

मला जगायचय , मला जगायचय

म्हणताना माझं जगायचंच राहिलं