कविता ! काय असते?
तिला शब्दात कधीच बांधता येत नाही,
कविता म्हणजे भावनांची दरी
तिला डोळ्यांनी सांधता येत नाही.
कविता निर्मळ असते
निळ्याभोर अभाळासारखी,
कविता एक गुढ असते
तिच्या काळ्याभोर डोळ्यांसारखी.
कविता हळुवार स्पर्श असतो
मनाने-मनाला केलेला,
कविता एक भास असतो
नकळत कुठुनसा झालेला.
जयेन्द्र.