चारोळ्या...

तिला झोप येते कशी
मी रात्रभर जागतोय,
या घराच्या चार भिंतीत
मी एकांताची सजा भोगतोय.

सगळ्यांमध्ये असुनही मी
असल्यासारखा नसतो,
सभोवतालच्या गर्दीतही
मी खुप एकटा असतो.

तुझं स्वप्न येते नेहमीच
म्हणून मी झोपत नाही आता,
तुझ्या आठवणीतलं हे "जाग्रण"
मला झेपत नाही अता.

मला कवितेत बोलायला आवडतं
मला शब्दांशी खेळायला आवडतं,
समझू नका कोणी सोडून गेलय
मला स्वत; ला छळायला आवडतं.

मन अगदीच वेडं नाहीये
एकांतात थोडं बावरलयं,
तसा वाया गेलो असतो मी
या शब्दांनी मला सावरलयं.

हसण्यास मनाई नाही मला
अन सुख म्हणजे सजा आहे,
सुखातल्या त्या आठवणींना
कवटाळून जगण्यात ही मजा आहे.

ज्यानं दुःखावलं मला
ते माणुस माझ्या खात्रीतलं होतं,
अता ज्या वाचल्या चारोळ्या
ते दुःख एका रात्रीतलं होतं.

                               जयेंद्र.