भरून आलेलं आकाश
गूढ मंद प्रकाश
हवाही स्तब्ध
कुणीतरी भारलेली
कधी कधी मन
येतं ना भरून
कंठ दाटून येतो
डोळे गरम होतात
भरू ही पाहतात
पण बरसत नाहीत
आणि सारं निवळतं
न बरसताच
अगदी हळू, सावकाश
तसच हे
भरून आलेल आकाश
मग …..
इतक्या वेळ चूप्प बसलेला
खोडसाळ वारा
ढगाना ढकलायला लागतो
हळूच येते ढगा आडून
सोनेरी किरणांची तान
बदलूनच जातं सारं
अगदी सारं हवामान
सारं काही पूर्ववत होतं
कसलीही खूण उरत नाही
काही क्षणांपूर्वी इथे काही घडल होतं
हेही कुणाला कळत नाही
हेही कुणाला कळत नाही
सुधीर