जायचे आहे कुठे?

पावलांना प्रश्न पडला, जायचे आहे कुठे?
संपला रस्ता तरी परतायचे आहे कुठे?...

ओळखीचे भेटले ते लोक मागे राहिले
सोबतीने आज त्यांना यायचे आहे कुठे?...

वादळे तर येत होती, जात होती नेहमी
मी म्हणालो घर मला बांधायचे आहे कुठे?...

दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी?
सत्य मजला यातले समजायचे आहे कुठे?...

मान्य मी आहेत केले भोग या नशिबातले
शेवटी इच्छेप्रमाणे व्हायचे आहे कुठे?...