सांजवेळी
डोळ्यात तुझ्या
पाणी का?
अधुरी एक
डोळ्यात तुझ्या
कहाणी का?
काही न घेता
फेडायची ती
देणी का?
नव्या क्षणांच्या भविष्यावर
जुन्या क्षणांच्या परीणामांची
करणी का?
हास्यात तुझ्या लपून राहिली
कुणा न कळली
विराणी का?
आयुष्यावर तुझ्या स्वत:च्या
उरल्या श्वासांची
अपुऱ्या स्वप्नांची
लेणी का?