ऋतूचा इशारा

ही रात्र ओली ओली
या मस्त झुळका
उठला हळू हळू
तो चंद्र लाडका लाडका

का आग-शी लावून
चिडीचूप आहे चांदणे
झोपू ही ना देई
ऋतूचा  हा इशारा ॥धृ॥

ऐटीत चाललेली हवा, नीलमणी-से शरीर
कळ्यांत असे बेशुद्धीची ओल
अशातही का बेचैन हे हृदय
आयुष्यात न जाणे काय आहे कमी

का आग-शी लावून... ॥

जे दिवसाउजेडी नाही मिळाले
हृदय धुंडी ऐशा स्वप्नाला
या रातीच्या झगमगाटात डुबलेली
मी धुंडून राहिले आपल्याला

का आग-शी लावून... ॥

-------------------------------------------------------------------

हे गीत कोणते ते ओळखा पाहू!