का मलाही सारखा आभास झाला..
चार ओळी खरडल्या तो व्यास झाला
आळणी होते तरी केलीच वा! व्वा!!
लंपटांचा बेतही फर्मास झाला
चार पैसे बांधण्या गाठीस तो ही ...
श्वापदांचा रोजचा मुखवास झाला
साधनेची प्रेरणा तो अश्रू होता..
म्हणुन वाल्या पात्र वाल्मीकांस झाला
माझिया परवानगीने आत जावे
मालकीचा माज हा कुलुपास झाला
श्वास त्याचे अंतरी रेंगाळले अन् ...
केवड्याला तेरड्याचा भास झाला