पेरुची भाजी

  • पेरू ५
  • तेल
  • मोहोरी
  • मीठ, गुळ
  • हळद, लाल तिखट
  • पाणी ३ कप
१५ मिनिटे
२ वाट्या

प्रथम पेरू धुऊन घ्यावे. त्याच्या प्रत्येकी ४ फोडी कराव्या. प्रत्येक फोडीमधला गर आणि बिया काढून टाकाव्या. ह्या फोडींचे लहान चौकोनी काप करावे. कढईत तेल गरम करावे. मोहोरी आणि हळद घालावी. तेल गरम झाल्यावर पेरूचे काप घालावे, १ ते २ मिनिटे तेलावर परतावे. त्यानंतर २-३ कप पाणी घालावे. चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ व गूळ घालावा. भाजी ७-१० मिनिटे शिजवावी. पेरूच्या फोडी मऊ आणि भाजीचा रस्सा थोडा घट्ट झाल्यावर भाजी उतरवावी. 

* वेळ अंदाजे दिला आहे.

* आंच मध्यम असावी.

चपाती अथवा ब्रेड सोबत वाढावी.

आई