भरडा भात

  • हरभरा डाळीचा रवा (जाडसर दळून आणने, अथवा विकतही मिळतो)- १ वाटी
  • तेल, मीठ, तिखट, कोथिंबीर बारीक चिरुन, भातासाठी तांदूळ
  • वरून घेण्यासाठी तेल व सुक्या मिरच्या, भाजलेला पापड
  • कढी साठी दही, बेसन, जिरे, कढी लिंब
२० मिनिटे
४ जण

प्रथम एका कढईत जरा जास्त तेलाची हिंग, हळद, लसणाची फोडणी करून त्यात ह. रवा चांगला भाजून घ्या (उपम्या प्रमाणे). त्यात हवे तसे तिखट, मीठ घालून नंतर आधणाचे पाणी बेताबेताने घालून वाफ आणावी. व मोकळा भरडा तयार करुन घ्यावा.
वर कोथिंबीर पेरावी.
 

गरम , वाफेच्या भातावर पळी भर भरडा वाढून घ्यावा. त्यावर चरचरीत फोडणीचे तेल व तळलेली लाल मिरची कुसकरावी.
गरम कढी व पापडा बरोबर आस्वाद घ्यावा!

(पोळीची  आठवण सुद्धा काढू नये! )

हा विदर्भातील जावयासाठीच्या पाहुणचारातील एक पदार्थ आहे!

आत्या